
खानापूर : लक्केबैल ता खानापूर येथे कृषीपथीन सोसायटी मार्फत अन्न व नागरी खात्याकडून मिळणारे धान्य (रेशन) वितरण करण्यात येते होते पण काल काही नागरिकांना रेशन वितरण करणार्या कर्मचारी वर्गाबद्यल संशय आल्याने त्यांनी वजन करून दिलेले रेशन बाहेरचा वजन काटा आणुन वजन केले असता त्या वजनात तफावत आढळून आली असता
ताबडतोब त्यानी खानापूर तहसीलदार व आहार निरीक्षकांना याची कल्पना दिली असता काल रात्री त्याठिकाणी तहसीलदार प्रकाश गायकवाड व त्यांचे सहकारी लक्केबैल येथे जाऊन तेथील तक्रार नोंदवुन घेतली व बेळगाव येथील अन्न व नागरी खात्याचे जॉईंट डायरेक्टराकडे कारवाई साठी पाठविले असता आज सायंकाळी त्यांनी लक्केबैल येथील धान्य वितरण करणाऱ्या कृषीपथीन सोसायटीची धान्य वितरण करण्यासाठी दिलेली लायसन्स रद्द करण्यात आली असल्याची ऑर्डर बजावली आहे,
कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे सोसायटीची लायसन्स रद्द झाली असल्याची चर्चा खानापूरात सुरू आहे
