आसाम-मेघालय सीमेवर पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात मंगळवारी पहाटे बेकायदा लाकूड वाहतूक करणारा ट्रक अडविल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात आणि हिंसाचारात वनरक्षकासह सहा जण ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर आसामपोलिसांनी मेघालयच्या सीमेवर असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती रोखण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या घटनेचे वृत्त सोशल मीडियावर पसरताच, मेघालयातील ७ जिल्ह्यांत हिंसाचार उफाळला असून, ४८ तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.