
स्मशानभूमीला जायला रस्ता नाही म्हणून ग्रामस्थांनी मृतदेह चक्क रस्त्यावर ठेऊन भजन म्हणून धरणे आंदोलन केले.
बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील नणदीवाडी गावात घडली.एकासंबा चिकोडी मार्गावर मृतदेह ठेऊन भजन करत धरणे आंदोलन करून दोन तासाहून अधिक काळ संतप्त ग्रामस्थांनी वाहतूक रोखून धरली.नणदीवाडी गावातील सुधाकर महादेव नायकर यांचे निधन झाले.
पण स्मशानभूमीला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचा वाद सुरू असल्याने मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात नेता येत नव्हता.म्हणून मृताच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी भर रस्त्यात मृतदेह ठेऊन भजन म्हणून धरणे आंदोलन छेडले.एकासंबी कुटुंबाचा आणि ग्रामस्थांचा स्मशान भूमीला जाण्याच्या रस्त्यावरून वाद सुरू असून स्मशानात जाण्याच्या रस्त्यावर झाडे आणि काटे टाकून बंद करण्यात आला आहे.पोलिसांना धरणे आंदोलनाचे वृत्त कळताच त्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्याचे मन वळवून आंदोलन मागे घ्यायला लावले आणि नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
