लोंढा : खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण आणि रेल्वेचे जंक्शन स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोंढा येथे श्री सद्गुरु शांडील्य महाराज मठाचा वार्षिक उत्सव दिनांक 13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत सप्तमी, अष्टमी, नवमी, असे तीन दिवस प्रति वर्षाप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे भाविकांनी याचा लाभ घ्यावात असे आव्हान मंदिर कमिटीतर्फे करण्यात आले आहे,
सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता अभिषेक व पूजा करण्यात येणार आहे त्यानंतर बारा वाजता तीर्थप्रसाद होऊन दुपारी ठीक एक वाजता मौजे लोंढा मांजरपै, सातनाळी, माचाळी, पिंपळे, मुंडवाड, घार्ली, सितावाडा, रामनगर, आडाळी, अस्तोली, आक्राळी, कुराडवाडा, राजवाळ, मोहिशेत, दुधवाळ, मिराशी वाटरे, घोसे, या गावच्या भजनी मंडळाच्या भजनाच्या तालात श्रीच्या पालखीची गावातून दिंडी निघणार आहे, मंगळवार दि 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत अभिषेक, होवुन महाप्रसाद होणार आहे,
बुधवार दि 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3-00 वा खळ्याच्या जंगी कुस्त्या होणार आहेत, त्यानंतर रात्री 8-00 वा “दिधले दान सौभाग्याचे” कौटुंबिक, सामाजिक, विनोदी नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव कमिटीने केले आहे,