
खानापूर : राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त शिक्षक आबासाहेब दळवी गुरूजी यांनी आपल्याला येणाऱ्या विधानसभेची उमेदवारी समितीतर्फे देण्यात यावीत म्हणून म ए समीतीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व पदाधिकाऱ्यांच्याकडे आपला अर्ज सादर केला,

यावेळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, प्रकाश चव्हाण, व पदाधिकारी तसेच मणतुर्गा, व तालुक्याच्या ईतर भागातून आलेले समीतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
यावेळी सीमाप्रश्न सुटत नाही तो पर्यंत पायात चप्पल घालणार नाही म्हणून प्रतिज्ञा केलेले व जवळ जवळ 15 वर्षे पायात चप्पल न घालता फिरणारे सीमातपस्वी रूक्माणा जुंझवाडकर, यांनी सुध्दा आपला अर्ज सादर केला आजपर्यंत एकुण सात जणांनी आपल्याला उमेदवारी द्यावीत म्हणून समितीकडे आपले अर्ज सादर केले आहेत,

