
खानापूर तालुक्यातील लोकोळी गावातील माजी विद्यार्थी संघटना व लोकोळी ग्रुप तसेच युवा वर्गाकडून व ग्रामस्थांच्या सहकार्याने ज्ञान दान करणाऱ्या ज्ञानमंदिराला आपुलकीचा हातभार लाभला असून गावातील 16/17 जणांनी प्रत्येकी दहा दहा हजार रुपये देणगी स्वरूपात शाळेला देऊन एक लाख सहासष्ठ हजार रुपयाची एफडी केली असून त्या व्याजातून मिळणारी रक्कम प्रतिवर्षी 15 ऑगस्ट ला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन धन म्हणून वाटप केली जाते

तसेच 2018 मध्ये मराठी शाळेचे रंगकाम करण्यासाठी जवळजवळ 75 हजार रुपये खर्च आला तो पण गावच्या सहकाऱ्याने करण्यात आला तसेच 2020 मध्ये शाळेला संध्या श्रीमंत पाटील यांनी आठ बाके, डेस्क बसण्यासाठी दिले असुन गावातील युवकांच्या व ग्रामस्थांच्या साह्याने दोन्ही शाळांना 25 हजार रुपये चे सहा ग्रीन बोर्ड देण्यात आलेले आहेत, शाळेतील हायस्कूलला 16 हजार रुपये किमतीचा प्रोजेक्टर दिला आहे तसेच दोघा माजी विद्यार्थ्यांनी हायस्कूलला ढोल ताशा सुपूर्द केला आहे तसेच 20 ते 21 जणांच्या सहकार्यातून 60 ते 65 हजार रुपये जमवले असून त्यातून शाळेसाठी 20 डेस्क बनवत आहेत

तसेच बऱ्याच लोकांनी कोणी फरशी,कपाटे खेळाचे साहित्य वह्या,पेन फिल्टर बसण्यासाठी मॅट असे बरेच साहित्य या गावातील शिक्षणप्रेमी ध्येयवेढ्यानी शाळेला सुपूर्द केले आहेत आत्ता त्यांचे पुढील उद्दिष्ट मराठी शाळेचे छत पत्रे घालून सुशोभित करण्याकडे आहे ते सुध्दा लवकरच पुर्ण होणार, तसेच पुढे सर्वांचे असेच सहकार्य मिळत राहिल्यास लवकरात लवकर शाळा डिजिटल होण्यास वेळ लागणार नाही युवा वर्गाने शाळेलाच मदत न करता गावातील तिरडीच्या शेड साठी अकरा हजार पाचशे रुपये सुध्दा खर्च केले आहेत अशा या आदर्श शिक्षण प्रेमी लोकोळी गावचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी सुद्धा घेण्यास हरकत नाही, या शाळेला व शिक्षण प्रेमी लोकोळी ग्रामस्थांना “आपलं खानापूर” कडुन मानाचा मुजरा,
( माहिती व छायाचित्र ज्योतिबा म पाटील यांच्या सौजन्याने)

