 
 
करोशी येथील तरुणाच्या उपचारासाठी अर्थिक मदत करण्याचे अवाहन
चिकोडी :
घरात गरिबी व हलाखीची परिस्थिती, शेत नाही, पत्नी, लहान दोन मुले अशातच घरातील कर्त्याला लिव्हर सिरोसीसचा आजार, आता लिव्हर ट्रान्सप्लांटशनची गरज असून यासाठी 22 लाख रुपयांचा खर्च येणार पण हातात पैसा नाही काय करणार अशी परिस्थिती बाजीराव सुळकुडे कुटुंबावर ओढावली आहे.

होय चिकोडी तालुक्यातील करोशी येथील 32 वर्षीय तरुण बाजीराव सुळकुडे याचे लिव्हर निकामी झाले आहे. तो पान शॉपचा व्यवसाय करीत असून पत्नी, आई व दोन मुले असा परिवार आहे. तर मोठे भाऊ पत्रकार आहेत. शेती नसून हातावरचे पोट आहे.
अशातच मागील दोन वर्षांपासून बाजरीव हे लिव्हरचे आजाराने त्रस्त आहेत. त्यांचे बंधू पत्रकार के एस सुळकुडे हे चिकोडी, निपाणी व बेळगाव येथील अनेक इस्पितळात उपचार दिले. पण त्याचा कांहीही उपयोग झालेला नाही. तात्पुरते बरे होते. पण पुन्हा तब्येत बिघडते.
आजपर्यंत बाजीराव यांच्या उपचारासाठी आठ लाखापर्यंत खर्च झाले आहेत.
सद्या त्यांच्यावर बेळगाव के एल ई संस्थेच्या डॉ प्रभाकर कोरे इस्पितळात उपचार सुरू होते. तेथील ज्येष्ठ डॉक्टरांनी बाजीराव सुळकुडे यांचे लिव्हर निकामी झाले असून लिव्हर ट्रान्सप्लांटशनची गरज असल्याचे सांगितले आहे.
यासाठी सुमारे 22 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पण या कुटुंबाकडे असलेले पैसे देखील खर्च झाल्याने आता लिव्हर ट्रान्सप्लांटशनसाठी व इतर वैद्यकीय उपचारासाठी पैसे नाहीत.
बाजीराव सुळकुडे यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत असून लवकरात लवकर लिव्हर ट्रान्सप्लांटशन करण्याची गरज आहे.
त्यामुळे लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्ति, संघ संस्था, दानशूर नागरिकांनी आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी फेडरल बँक खाते क्रमांक : 19390100033095
आयएफएससी कोड : FDRL0001939
किंवा 9632731806 या क्रमांकावर पाठवुन मदत करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 
         
                                 
                             
 
         
         
         
        