 
 
खानापूर : दि 11 (प्रतिनिधी तानाजी गोरल)मंणतुर्गा गावचे प्रगतशील शेतकरी, अण्णाप्पा पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात गाईचा दुधाचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे जवळपास दहा गायी असून .गायींची देखभाल व्यवस्थित करत होते, रोज गायी धुणे. गायींना बसायला मॅट घालने स्वच्छता ठेवने अशा पद्धतीने त्यांची देखभाल करीत होते .व्यवसाय चांगला होता पण आज अण्णाप्पा पाटील मणतुर्गा यांची दुभती गाय लंपी आजारा मुळे आज दगावली असून ती गाय दिवसाला एका वेळेला बारा लिटर दूध देत होती म्हणजे दोन्ही वेळेला 24 लिटर दुध देत होती सदर गायीची किंमत दीड लाख रूपये इतकी होती, त्यामुळे शेतकऱ्याचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झाले असुन या आजारा मुळे शेतकर्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे
शासनाने गावोगावी जाऊन जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांना औषधे गोळ्या घरपोच देऊन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरीने प्रयत्न करावेत व शेतकऱ्यावरील संकट दूर करवेत व झालेले आर्थिक नुकसान सावरण्यासाठी योग्य ती मदत सरकारने करावीत अशी मागणी नागरिकातून व शेतकऱ्यातून होत आहे,
 
 
 
         
                                 
                             
 
         
         
         
        