
खानापूर : खानापूर तालूक्यातील नागरगाळी भागातील कोसेकोप (गवळीवाडा) गावात 10 फेब्रुवारी रोजी एका गरीब कुटूंबाच्या गवत गंजीना व ट्रॅक्टर ला आग लागून बरेच नुकसान झाल्यानें त्यांच्यावर वाईट परिस्थिती निर्माण झाली होती हि गोष्ट कॉंग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब कोसेकोप गवळीवाडा गावात जावुन सदर कुटूंबाची भेट घेतली व त्याना आपल्या तर्फे 25000 हजारांची मदत त्यांच्याकडे सुपूर्द केली,

ट्रॅक्टरचे इन्शुरन्स काही दिवसांपूर्वीच संपले होते त्यामुळे ईन्शुरन्स कंपनीकडून त्यांना नूकसान भरपाई मिळणार नव्हती म्हणून माणुसकीच्या नात्याने त्यांनी सदर कुटुंबाला मदत केली, तसेच ट्रॅक्टर व गवत गंजीला आग लागली त्या दिवशी लोकांनी त्यांना संपर्क करून अग्निशमन दलाला पाठविण्याची विनंती केली होती त्यादिवशी त्यांनीच अग्निशामन दलाला त्या ठिकाणी कल्पना देऊन पाठविले होते व स्वतः सुद्धा त्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पहाणी करून गेले होते,
