बेळगाव, दिनांक : विरंगुळा म्हणून किटवाड धबधबा आणि निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तिघां युवतींचा किटवाड धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.बेळगावच्या काही महिलांचा गट आनंद घेण्यासाठी किटवाडला गेला होता. मौज करण्यासाठी काही महिला आणि युवती पाण्यात उतरल्या होत्या. पाण्यात उतरलेल्या चार-पाच महिलांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्या पाण्यात बुडाल्या. यावेळी एकीला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मात्र तिघा युवतींचा मृत्यू झाला तर एकीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे,