
तीओली गावातील पास्कु पिंटो यांचे बंद असलेले घर फोडून जवळ जवळ आडीज 2.5 तोळे सोने, साड्या व इतर मौल्यवान वस्तूची चोरी झाल्याची घटना आज घडली असुन पास्कु पिंटो यांची मळणी असल्याने ते व त्यांच्या घरातील सर्वजण गावातील मजूर घेऊन शेतात गेले होते

नेमके याच गोष्टींचा फायदा चोरट्यांनी उठवला असल्याचे समजते, गावातील काही जनानी दोन संशयित ईसम तीओली वाड्याच्या रस्त्याने दुचाकीवरून जाताना पाहिले असल्याचे सांगितले आहे, सदर चोरीचा गुन्हा खानापूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत,
