
‘मजदूर नवनिर्माण संघ’ आणि बेळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्यात आला.
बेळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटना व ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने सोमवार दिनांक 1 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता उद्यमबाग (मजगांव) येथील जिल्हा कामगार कचेरीच्या आवारात महात्मा गांधीजींच्या फोटोचे पुजन करून मनरेगा व बांधकाम कामगारांच्या सोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. यासमयी असिस्टंट कमिशनर ए.बी. अन्सारी, जेष्ठ सर्वोदयी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, ॲड एन आर लातूर यांनी समयोचित भाषणे केली.
यावेळी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. कार्यक्रमाला कविता मुरकूट्टी, अडव्याप्पा कुंबरगी, समाजसेवक विठ्ठल देसाई, सुनील गावडे, राजू तारीहाळकर, जिल्हा कामगार कचेरीचा अधिकारी वर्ग आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मजदूर नवानिर्माण संघाच्या’ मार्फत मनरेगा कर्मचाऱ्यांच्या वतीने आजच्या दिवशी काम बंद ठेवण्याऐवजी काम चालू ठेवून कामाच्या ठीकाणीच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्यात येईल असे राहुल पाटील यांनी सांगितले.
