
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महामेळावा आयोजित केला होता हा महामेळावा कर्नाटक सरकारने दडपशाहीने मध्यवर्ती समितीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन उधळून लावण्याचा प्रयत्न केला हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी खानापूर समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारणी सदस्य व कार्यकर्त्यांनी बेळगाव मध्ये मराठी माणसावर सुरू असलेली आजची दडपशाही व होणाऱ्या अन्याय कोगनोळी ला आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्रचे माजी मंत्री व कागलचे आमदार हसन मुश्रीफ जी यांच्या कानावर घातली व महाराष्ट्र सरकारचे नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवून न्याय देण्याची मागणी केली, तसेच शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री विजय देवणे यांचीही भेट घेऊन दडपशाहीची माहिती दिली, यावेळी माजी सभापती सुरेशराव देसाई संभाजी देसाई पीएच पाटील जगन्नाथराव बिरजे मध्यवर्तीचे सदस्य रणजीत पाटील निरंजन सरदेसाई बळीराम पाटील सुनील पाटील खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील विनायक सावंत किशोर हेबाळकर रामचंद्र गावकर पुंडलिक पाटील नागेंद्र जाधव आधी जण या भेटीवेळी उपस्थित होते
