
खानापूर : प्रती वर्षा प्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) ची रथयात्रा सोमवारी दुपारी 4-00 वा बेळगाव ईस्कॉनचे स्वामी श्री भक्तीरसाआमृत महाराज, यांच्या हस्ते सुभद्रा, कृष्ण, बलराम, यांच्या मुर्तीची व रथाची पुजा होवुन जांबोटी क्रॉस येथून सुरू करण्यात आली, यावेळी सामाजिक कार्यकर्ते इरफान तालीकोटी, माजी नगराध्यक्ष मझहर खानापूरी, ईस्कॉनचे प्रमुख जेष्ठ मंडळी उपस्थित होते,

यावेळी रथयात्रेत खानापूर शहर व तालूक्यातील तसेच बेळगाव व परिसरातील हजारो कृष्ण भक्तांनी भाग घेतला होता, रथयात्रा खानापूर शहरातील वेगवेगळ्या मार्गांनी फिरून सायंकाळी 7-00 वा मलप्रभा नदि घाटाकडील इस्कॉन मंदिरात दाखल झाल्यानंतर भजन कीर्तन होवुन महाप्रसाद झाला जवळपास 8 ते 10 हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला,

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालूका अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार अरविंद पाटील, भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी, कर्नाटक राज्य वन निगम डायरेक्टर सुरेश देसाई, कीरण यळूरकर, माजी ता पं सदस्य अशोक देसाई, लैला शुगर एम डी सदानंद पाटील, यांनी भजन कीर्तनात भाग घेवून महाप्रसादाचा लाभ घेतला,
खानापूर इस्कॉन मंदिराचे प्रमुख नागेंद्र प्रभूजी यांनी मंदिराच्या वतीने या सर्वांचे स्वागत केले,

