
खानापूर : तालुक्यातील हत्तरवाड गावातील शेतकरी रामनिंग परशराम गावडा वय वर्षे 45 हे शेतात काम करत असताना त्यांच्या पोटात बैलाने सिंग घुसविल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत,
बैलाने पोटात शींग घुसवील्याने पोट थोडे फाटून आंतडे बाहेर आले असल्याने तेथील नागरिकांनी त्यांना ताबडतोब खानापूर येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले व याची कल्पना माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांना फोनवरुन दिली असता, ताबडतोब माजी आमदार अरविंद पाटील सुद्धा त्या ठिकाणी पोहचले असता

डॉक्टरांनी त्यांना सांगितले की शेतकऱ्याचे पोट फाटलेले असून आंतडे बाहेर आले आहे त्यामुळे ऑपरेशन करावे लागेल त्यासाठी पुढील उपचारासाठी बेळगावला ताबडतोब घेऊन जाण्यास सांगितले असता अरविंद पाटील यांनी सदर शेतकऱ्यास अंँम्बुलन्स मध्ये घालून के एल ई हॉस्पिटल ला पाठविले व त्याची कल्पना के एल ई हॉस्पिटल ला दिली,

