खानापूर तालुक्यातील ओलमनी येथील नागरीक नवनाथ साबळे यांनी “आपलं खानापूर” बरोबर संपर्क साधून सांगितलेली माहिती असी की त्यांच्या पत्नी आजारी असल्याने त्या दवाखान्यात उपचार घेत आहेत खर्च पण जास्त येत असल्याने त्यांनी बर्याच लोकांना व नेतेमंडळीना मदत करण्यासाठी विनंती केली पण कोणीही त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले नाहीत पण एकमेव व्यक्ती मदतीसाठी धावून आले ते म्हणजे माजी आमदार अरविंद पाटील, अरविंद पाटील यांच्या कानावर हि गोष्ट पडताच ताबडतोब त्यांनी ऑनलाईन द्वारे आर्थिक मदत केली असुन अडचणी च्या वेळी आर्थिक हातभार लावुन मदत केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले आहेत,