हलशीवाडी नागझरी तलावास जलपर्णीचा विळखा ! नागरिकांच्या व पाळीव जनावरांच्या जीवितास धोका !
हलशी ; हलशीवाडी (ता. खानापूर) येथील गावच्या पश्चिमेला असणाऱ्या, नागझरी तलावास विषारी जलपर्णीचा विळखा पडला आहे. गेल्या वर्षभरापासून तलावात जलपर्णीला सुरुवात झाली होती. त्या काळात ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने, संपूर्ण तलावालाच या जलपर्णीने वेढले आहे. परिणामी जनमानसावर तसेच पाळीव जनावरांना, याचा धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने, तातडीने ही जलपर्णी काढणे गरजेची असल्याची मागणी ग्रामस्थातून होत, आहे.
गावाला लागूनच हा विस्तीर्ण तलाव असून, याला बारा माही पाणी असते. ऐन उन्हाळ्यात, या तलावाचा उपयोग हलशीवाडी व हलशी गावातील नागरिकांना होत, असतो. जनावरांना पाणी पाजण्यापासून कपडे धुणे आदी जीवनोपयोगी कामासाठी या तलावाचा उपयोग केला जातो. गेल्या आठ वर्षांपूर्वी या तलावाचे, लाखों रुपये खर्च करून खोदाईकरण करण्यात आले, आहे. यामुळें शेकडो एकर जमीन, या तलावाच्या ओलिताखाली पिकत आहे. या तलावात मध्यंतरी काहींनी मच्छपालन व्यवसायही केला होता. या तलावात नेहमी नागरिकांचा व पाळीव जनावरांचा वावर असतो. मात्र तलावाला जलपर्णीने वेढले असल्याने, पाण्यात शिरलेल्या जनावरांना, याचा मोठा धोका होण्याचा संभवता निर्माण झाली आहे. ही जलपर्णी काटेरी असून, माणसाला किंवा जनावरास, याचा काटा टोचताच हिवताप होण्याचा संभवता असतें. सध्याही जलपर्णी कोवळी असल्याने, अध्याप काटेरीपणा आला नसल्याने, ती बाहेर काढण्यास सोपे जाणार आहे. अन्यथा कालांतराने, याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
ग्रामपंचायत सदस्यांच्या डोळ्या देखत जलपर्णीचा विळखा तलावास पडत असला, तरी, काढण्याची तजबीज अद्याप तरी करण्यात आली नाही. यामुळे ग्रामस्थातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील घोटण तलावाला देखील सात वर्षांपूर्वी असाच जलपर्णीचा विळखा पडला होता. त्यावेळी कदब साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष उमेश देसाई, यांनी या विरोधात आवाज उठविताच तात्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी, त्याचा पाठपुरावा केला होता. व लागलीच त्या तलावातील जलपर्णी काढल्याने, घोटण तलाव आज पूर्णपणे स्वच्छ झाला आहे. त्याच पद्धतीने तलावातील जलपर्णी देखील हटवावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.