गोकाक तालुक्यातील अडीवेट्टी गावच्या आजोबांनी इंधन आणि सिलिंडरचे दर कमी करावेत मागणीसाठी पंचाहत्तर किलोमिटर सायकल चालवून बेळगावला येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सामाजिक कार्यकर्ते कल्लय्या निंगय्या मठपती यांनी विविध मागण्यासाठी गोकाक येथून सायकलवरून येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.सकाळी आठ वाजता ते
गोकाक येथून सायकलवरून निघाले आणि दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बेळगावला पोचले.
सिलिंडर आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे गोकाक येथून सायकलवरून बेळगावला येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.
सिलिंडरचे दर कमी करावेत,अपंग व्यक्तींना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ करावी,जनलोकपाल विधेयक त्वरित अमलात आणावे,जंगम समाजाला आरक्षण द्यावे अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.पूर्वी सिलिंडर ला सबसिडी मिळत होती पण आता ती बंद झाली आहे.त्यामुळे गरिबांना चरितार्थ चालवणे अवघड झाले आहे.सिलिंडर दरात किमान पाचशे रुपयांची कपात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.इंधन दर वाढल्यामुळे बस तिकीट देखील वाढले आहे.सर्वसामान्य जनतेला प्रवास करणे देखील खर्चिक झाले आहे असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.