
खानापूर येथील मलप्रभा नदि घाटाला लागुन असलेल्या पुलावर प्रतीवर्षी प्रमाणे कार्तिकोत्सव आमावश्येला पाणी आडवीण्यासाठी फळ्या (पत्रे) घालण्यात आलेल्या असुन उद्या सकाळ पर्यंत मलप्रभा नदि भाविकांना व नागरिकांना तुडुंब भरलेली दिसणार आहे,

सदर पाणी आडवीण्यात आल्याने मलप्रभा नदीला येणाऱ्या भाविकांना याचा उपयोग तर होणार आहेच त्याचबरोबर खानापूर शहर व परिसरातील नागरिकांना घरगुती व शेतीसाठी सुध्दा एप्रिल ते मे महिन्यापर्यंत पाण्याचा उपयोग होणार आहे,

