लिंगायत पंचमसाली आणि धर्मातील इतर उपपंथांसाठी २ अ ओबीसी वर्गात आरक्षण मिळावे यासाठी आवाज उठविण्या संदर्भात दि.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा.
गंदिगवाड (ता. खानापूर) येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती लिंगायत पंचमसाली कुडलसंगम पिठाचे चन्नबसव मृत्युंजय स्वामी यांनी दिली आहे,
अधिवेशनाबाबत गुरुवारी हिरेहट्टीहोळी व देवलत्ती येथे भेट देऊन
तेथील लोकांना माहिती देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी लिंगायत महासभेचे अध्यक्ष संगमेश वाली, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, अशोक यमकनमर्डी,
संतोष हंजी, भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा युवा नेते पंडित ओगले, बसवराज सनिकोप्प, आदी उपस्थित होते.