निपाणी,दिनांक 6
शनिवार दिनांक 12 ते गुरुवार दिनांक 17 पर्यंत समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर अरिहंत ट्रॉफी आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली आहे.
सहकाररत्न रावसाहेब पाटील ( दादा ) युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या सहकाऱ्यांने आणि निपाणी फुटबॉल अकॅडमीचे अध्यक्ष धनंजय मानवी यांच्या नेतृत्वाखाली अकॅडमीचे प्रशिक्षक सचिन फुटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे.
बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेतील विजेत्या संघाला 1 लाखाचे बक्षीस तर उपविजेत्या संघास 75 हजार रुपये देण्यात येणार आहे. शिवाय स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दोन संघांना प्रत्येकी 25 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे, असेही उत्तम पाटील यांनी सांगितले आहे.
समर्थ मंडळ व्यायाम शाळेचे डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी स्पर्धेकरिता मैदान उपलब्ध करून दिले आहे . निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळण्याचे उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे . या स्पर्धेत मुंबई कर्नाटक तेलंगणा व इतर राज्यातील 24 संघ सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरीची व्यवस्था केली आहे .
स्पर्धेसाठी पृथ्वीराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे . स्पर्धेसाठी बेंगळूर आणि पुणे येथील आंतरराष्ट्रीय पंचांना आमंत्रित केले आहे . दररोज चार संघ खेळविले जाणार आहेत . निपाणी व परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 4 संघांना आमंत्रित केले असून त्यापैकी दोन संघांची निवड केली आहे . तर दोन संघांना प्रतीक्षेत ठेवले आहे.
नगरसेवक संजय सांगावकर , इम्रान मकानदार , गजानन कावडकर , सचिन फुटाणकर , ओंकार शिंदे , जॉन मधाळे , करण माने , प्रशांत आजरेकर , शिवकांत खानापुरे , राहुल निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. निपाणी फुटबॉल ॲकाडमीचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.