सरकारी भू अतिक्रमित शेतकरी संघटना 2004 मध्ये स्थापन झाली असून त्या संघटनेद्वारे आंदोलने करून सरकार दरबारी प्रयत्न करून करून तालुक्यातील जवळजवळ पाच हजार एकर जमीनी गायरान, एच एल, रेवणु पड, तसेच फॉरेस्ट शेतकरी कसत असलेल्या अतिक्रमणित जमिनी नियमित करणारे बिल केंद्रीय मंत्री मंडळात 2006 मध्ये खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या प्रयत्नाने पास झाले असून आत्ता दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री बसवराज बोमई या खात्याचे मंत्री शिवराम हेब्बार तसेच माजी मंत्री आर व्ही देशपांडे यांच्या प्रयत्नाने राज्यात सुध्दा पास झाले असुन सरकारने ज्यांनी अतिक्रमित जमिनी केल्या आहेत त्यांच्याकडून कागदपत्रे मागितले असून त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेच्या वतीने दिनांक 17 ऑक्टोंबर 2022 रोजी राजा श्री शिवछत्रपती स्मारक येथे मार्गदर्शन मेळावा बोलविण्यात आला असून त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली असून सर्व आधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई यांनी आज बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले तसेच सर्वानी बहुसंख्येने उपस्थित राहण्याची विनंती ही त्यांनी केली, यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय देसाई सेक्रेटरी शत्रुघ्न तिनेकर उपाध्यक्ष बाबल रामचंद्र खांडेकर, नामदेव शिंदे, बळवंत मिसाळ, पुण्णापा सुतार,उमाप्पा गावडे, विश्वनाथ गावडे, यमनाप्पा परशराम मादार, हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते