
बागायत खात्यातर्फे फळे आणि फुलांचे प्रदर्शन बेळगावातील ह्युलम पार्क येथे भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारची फळे,फुलांची रोपे तर. विक्रीला ठेवण्यात आली आहेत शिवाय फुलांच्यापासून विविध प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
या प्रदर्शनाला भेट देणे म्हणजे एक नेत्रसुखद अनुभव आहे.सध्या गाजत असलेल्या कांतारा चित्रपटातील कॅ रॅ ॲक्टर देखील फुलाने साकारण्यात आले आहे.विविध प्रकारचे पक्षी,मासे यांच्या फुलांच्या प्रतिकृती देखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची चे लक्ष वेधून घेतात .क्रांतिवीर संगोळी रायण्णा ,भव्य नंदी,मोर, मत्स्यकन्या देखील प्रदर्शनाचे आकर्षण ठरले आहेत.सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आला असून सेल्फी काढून घेण्यासाठी देखील लोक गर्दी करत आहेत.विविध प्रकारचे कॅक्ट्स ,फुलांची ,फळांची झाडे देखील प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.याशिवाय अनेक प्रकारचा भाजीपाला,विड्याची पाने आणि फळे देखील प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
