
माजी सैनिक मल्टीपर्पज को – ऑप सोसायटी लि. खानापूर, या संस्थेचा बारावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी साजरा करण्यात आला,
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक लक्ष्मण पाटील व संस्थेचे चेअरमन जयराम पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करून केक कापण्यात आला व वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन मारुती गुरव संचालक रामकृष्ण पाटील विठ्ठल पाटील परशराम हेबाळकर विष्णू घोडेकर, संचालिका विद्या जाधव, राजश्री पाटील व सेक्रेटरी शितल पाटील व सभासद उपस्थित होते, यावेळी उपस्थितांनी संस्थेच्या प्रगतीबद्यल आपापले विचार मांडले,
