
खानापूर : खानापूर -14 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2023 प्रेस नोट क्र.CT/PN/24/2023 दिनांक 29 03-2023 निवडणूक आयोग निवडणूक आचार संहितेच्या उल्लंघनाबाबत सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी पुढे आले असून, त्यासाठी फेसबुक पेज आणि व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये चुकीची माहिती पसरवल्यास त्या ग्रुपच्या ऍडमिनला थेट जबाबदार धरण्यात येईल आणि गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती खानापूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे,
खालील खोट्या बातम्या पसरविल्यास ग्रुप प्रशासकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल
- उमेदवारांनी इतर राजकीय पक्षा विरोधात किंवा उमेदवारा विरोधात खोटी बातमी देऊ नयेत
- मतदान प्रक्रिया evm मशीन बद्दल गैरसमज पसरविणारी चुकीची खोटी माहिती देऊ नयेत
- निवडणुकीला बसलेल्या उमेदवारा विरोधात कोणतेही चुकीचे मेसेज पाठवू नयेत
- फोटो एडिट करून चुकीचे बनवून पाठवू नयेत
- निवडणुकीबद्दल चुकीचे सर्वे केलेले निवडणूक रिझल्ट छापू नयेत
- दारू जेवण पैसे द्यायलेत म्हणून पुरावा असल्याशिवाय चुकीचे मेसेज पाठवू नयेत
