
उद्यापासून दि 31 मार्च 2023 पासून एस एस एल सी परीक्षेला सुरुवात होत असून परिक्षा दि 15 एप्रिल 2023 पर्यंत चालणार असुन परिक्षेत गैर प्रकार रोखण्यासाठी सीटींग स्कॉड, फ्लायींग स्कॉडची नेमणूक केली असल्याची माहिती खानापूर च्या बी ई ओ, राजश्री कुडची यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे,
तालुक्यातून मराठी, कन्नड, इंग्लिश, उर्दू, अशा चार भाषेत ही परीक्षा होणार असून एकुण 3706 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत यामध्ये 1785 विद्यार्थी तर 1773 विद्यार्थिनी एकूण 3558 रेगुलर विद्यार्थी आहेत तर एक्स्टर्णल परीक्षेला बसणारे 123 विद्यार्थी व 25 विद्यार्थिनी एकूण 148 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत,
या परीक्षेसाठी 16 परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून 158 ब्लॉक मध्ये ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सीटिंग स्क्वाड व फ्लाईंग स्क्वाड अशी निर्मिती करण्यात आली असून फिरते पथक फ्लाईंग स्क्वाड मध्ये तहसीलदार तालुका पंचायतचे EO शिक्षण अधिकारी BEO अशी तीन पथकांची नेमणूक केली असुन सीटिंग स्कॉड मध्ये 16 जन आहेत ते परीक्षा केंद्रात बसून रहाणार आहेत, तसेच पोलीस बंदोबस्त ही चोख ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बीइओ ऑफिसचे मॅनेजर प्रकाश होसमणी, बीइओ ऑफीसचे विकल चेतन संपन्न मुल्य अधिकारी शंकर कमार, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील चीगुळकर, व पत्रकार मंडळी उपस्थित होते,
