गोकाकमध्ये बनावट नोटा, पाच जणांना अटक.
बेळगाव : (प्रतिनिधी) गोकाक तालुक्यातील कडबगट्टी येथे बेकायदेशीर बनावट नोटा बनवून, त्या चलनात आणून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन कारवाई करून सहा जणांना अटक करण्यात आल्याचे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी सांगितले. मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी ते बोलत होते. गोकाक-बेळगाव मार्गावरील कडबगट्टी गावातून जात असलेली एक कार पहाटे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अडवली, यादरम्यान हा प्रकार उघड झाला.
गोकाक तालुक्यातील कडबगट्टी रस्त्याने बेळगावकडे येणाऱ्या स्विफ्ट वाहनातून बनावट नोटांची वाहतूक करण्यात येत होती. या कारवाईत 100 रुपयांच्या 305 आणि 500 रुपयांच्या 6792 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या कारवाईत अरभावी मधील अनवर महंमदसलीम यादवाड (26), महालिंगपूर येथील सद्दाम मुसा यडहळ्ळी (27), हुंडाप्पा महादेव ओनशेवी (27), रवी चन्नाप्पा ह्यागाडी (27), विठ्ठल हणमंत होसकोटी (29), मल्लप्पा यल्लाप्पा कुंबाळी (29) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी नोटा वितरण केल्याची कबुली दिली असुन, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान गोकाक, महालिंगपूर, मुधोळ, यरगट्टी, हिडकल धरण, बेळगाव, धारवाड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये चलनी नोटांच्या बदल्यात बनावट नोटा वीतरीत केल्या आहेत.
चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अरभावी गावातील अन्वर यादव यांच्या घरातून बनावट कागदपत्रे, संगणक, प्रिंटर आणि मोबाईल फोन आदी उपकरणे जप्त केली आहेत. उघड झालेल्या प्रकारामुळे स्थानिक पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाच्या खोलवर तपासासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेबाबत गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ಗೋಕಾಕದಲ್ಲಿ ನಕಲಿ ನೋಟು ಸಾಗುತ್ತಿದ್ದ ಐವರ ಬಂಧನ.
ಬೆಳಗಾವಿ: (ಪ್ರತಿನಿಧಿ) ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ ಡಾ. ಭೀಮಾ ಶಂಕರ ಗುಳೇದ್ ಅವರು ನೀಡಿದ ಮಾಹಿತಿ. ಅವರು ಮಂಗಳವಾರ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡುತ್ತಾ ಗೋಕಾಕ-ಬೆಳಗಾಂವ ಮಾರ್ಗದ ಕಡಬಗಟ್ಟಿ ಗ್ರಾಮದ ಮೂಲಕ ಸಾಗುತ್ತಿದ್ದ ಕಾರನ್ನು ಮುಂಜಾನೆ ಗಸ್ತಿನಲ್ಲಿದ್ದ ಪೊಲೀಸರು ತಡೆದು ನಂತರ ಘಟನೆ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ.
ಗೋಕಾಕ ತಾಲೂಕಿನ ಕಡಬಗಟ್ಟಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಕಡೆಗೆ ಬರುತ್ತಿದ್ದ ಸ್ವಿಫ್ಟ್ ವಾಹನದಲ್ಲಿ ನಕಲಿ ನೋಟುಗಳನ್ನು ಸಾಗಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಈ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯಲ್ಲಿ 100 ರೂಪಾಯಿಯ 305 ಮತ್ತು 500 ರೂಪಾಯಿಯ 6792 ನಕಲಿ ನೋಟುಗಳನ್ನು ಪೊಲೀಸರು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ.
ಈ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯಲ್ಲಿ ಆರೋಪಿಗಳಾದ ಅರಭಾವಿಯ ಅನ್ವರ್ ಮಹಮ್ಮದ್ ಸಲೀಂ ಯಾದವಾಡ (26), ಮಹಾಲಿಂಗಪುರದ ಸದ್ದಾಂ ಮೂಸಾ ಯಡಹಳ್ಳಿ (27), ಹುಂಡಪ್ಪ ಮಹಾದೇವ ಓಂಶೇವಿ (27), ರವಿ ಚನ್ನಪ್ಪ ಹಗ್ಗಡಿ (27), ವಿಠ್ಠಲ್ ಹನ್ಮಂತ ಹೊಸಕೋಟಿ (29), ಮಲ್ಲಪ್ಪ ಯಲ್ಲಪ್ಪ ಕುಂಬಳಿ ( 29) ಬಂಧಿಸಲಾಗಿದೆ.
ಆರೋಪಿಗಳು ನೋಟುಗಳನ್ನು ಹಂಚಿರುವುದಾಗಿ ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದು, ಅವರನ್ನು ನ್ಯಾಯಾಂಗ ಬಂಧನಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಸಲಾಗಿದೆ. ವಿಚಾರಣೆ ವೇಳೆ ಬಂಧಿತ ಆರೋಪಿಗಳು ಗೋಕಾಕ, ಮಹಾಲಿಂಗಪುರ, ಮುಧೋಳ, ಯರಗಟ್ಟಿ, ಹಿಡಕಲ್ ಧರಣ, ಬೆಳಗಾವಿ, ಧಾರವಾಡ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವು ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾರಿ ನಕಲಿ ನೋಟುಗಳನ್ನು ವಿತರಿಸಿದ್ದಾರೆ.
ತನಿಖೆ ವೇಳೆ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿರುವ ಮಾಹಿತಿ ಮೇರೆಗೆ ಅರಭಾವಿ ಗ್ರಾಮದ ಅನ್ವರ್ ಯಾದವ್ ಎಂಬುವವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಕಲಿ ದಾಖಲೆ, ಕಂಪ್ಯೂಟರ್, ಪ್ರಿಂಟರ್, ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ ಗಳನ್ನು ಪೊಲೀಸರು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಘಟನೆ ಸ್ಥಳೀಯ ಪೊಲೀಸರಲ್ಲಿ ಆತಂಕ ಮೂಡಿಸಿದೆ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸರು ಆಳವಾದ ತನಿಖೆ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಘಟನೆ ಕುರಿತು ಗೋಕಾಕ ಗ್ರಾಮೀಣ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದೆ.