येथील केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्या शनिवारी दुपारी २ दोन वाजता जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यासाठी दोन राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.