सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त श्री गणेशोत्सव मंडळ सावरगाळी यांच्यावतीने खुल्या रेकॉर्ड डान्स व भाषण स्पर्धा.
लोकमान्य सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ सावरगाळी यांच्या वतीने खास सुवर्णमहोत्सवानिमित्त सावरगाळी येथे रविवार दिनांक 15-09-2024 रोजी रात्री ठीक 7 वाजता खुल्या रेकॉर्ड डांन्स स्पर्धा व भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

खुल्या डान्स स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 7001 रूपये मंडळाकडून, दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक 5001 रूपये वीवेक गंगाराम पाटील व चेतन पुंडलिक पाटील गोवा यांच्याकडून, तिसरे पारितोषिक 3001 रूपये, तर चौथे बक्षीस 2001 रुपये असून, पाचवे बक्षीस 1000 रुपये (मंडळाकडून), सहावे बक्षीस 701 रु मंडळाकडून, सातवे बक्षीस 500 रूपये मंडळाकडून देण्यात येणार आहे.

भाषण स्पर्धेसाठी दोन ग्रुप करण्यात आले असून, एक खुला ग्रुप तर दुसरा ग्रुप इयत्ता आठवी खालील विद्यार्थीसाठी आयोजित करण्यात आला आहे. खुला गट भाषण स्पर्धेसाठी चार विषय देण्यात आले आहेत.1). कुणाच्या डोक्यात शेती धोक्यात ?. 2).भ्रष्टाचाराच्या किडीवर कोणत कीटकनाशक फवाराव ?
3). व्यवस्थेला सुरंग लावणारे संत ‘विद्रोही तुकाराम’.
4). डिजिटल इंडियाचे भविष्य.
या स्पर्धेसाठी वेळ सात मिनिटे देण्यात आला असून प्रथम क्रमांकाचे बक्षिस 2500 रु, दुसरे पारीतोषीक 1500 रु, तिसरे पारितोषिक 1000 रू, तर चौथे बक्षीस 700 रू देण्यात येणार आहे.
आठवी खालील लहान गटांसाठी सुद्धा चार विषय देण्यात आले आहेत. 1. युगप्रर्वतक छत्रपती शिवाजी महाराज, 2) माझा बाप शेतकरी, 3). माझी सावित्री होती म्हणून…4). मोबाईल शाप की वरदान ? असे विषय देण्यात आले असून, या स्पर्धेसाठी पाच मिनिटे वेळ देण्यात आला आहे. तर पहिले बक्षीस म्हणून 1500 रूपये, दुसरे पारितोषिक 1000 रू, तिसरे 700 रू, तर चौथे पारितोषिक 500 रुपयांचे देण्यात येणार आहे.

