नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केलेली मागणी आज दिवसभर चर्चेचा विषय ठरली आहे. भारतीय नोटांवर (Currency Notes) भगवान गणेश आणि लक्ष्मी यांची चित्र छापण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे भारतीय जनता पक्षासह देशातही खळबळ माजली.पण एका मुस्लिम देशात अगोदरच तिथल्या नोटांवर भगवान गणेशाचं छायाचित्र असल्याचे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? पण ही गोष्ट अगदी खरी आहे. मुस्लिम राष्ट्र असताना ही या देशाने असे केले तर भारतात असे का होऊ शकत नाही? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.तर मुस्लिम देश असूनही इंडोनेशिया या देशाने भगवान गणेशाचे छायाचित्र (Lord Ganesh Pic on Currency Note) त्यांच्या नोटावर छापले आहे. बाप्पा इंडोनेशियाच्या काही नोटांवर दिसून येतो. ही काय बाब आहे, ते समजून घेऊयात..इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश आहे. हा जगातील तिसरा सर्वात मोठा लोकशाही देशही आहे. इंडोनेशियात सध्या 85 टक्के मुस्लिम तर 2 टक्के हिंदू आहेत.मुस्लिम देश असूनही या देशाच्या 2000 रुपयांच्या नोटेवर गणपत्ती बाप्पाचे छायाचित्र आहे. बाप्पाच्या छायाचित्रासह या नोटेवर इंडोनेशियाचे पूर्व शिक्षण मंत्री हजर देवान्तर (Ki Hajar Dewantara) यांचेही छायाचित्र आहे.तर 2000 रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूसही छायाचित्र आहे. नोटेच्या मागील बाजूला वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा फोटो ही आहे. त्यामुळे या नोटेवर बाप्पासोबतच शिक्षण मंत्री आणि विद्यार्थ्यांचाही फोटो आहे.इंडोनेशियामध्ये 6 धर्मांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यात इस्लाम, प्रोटेस्टंट, कॅथाॉलिक, हिंदू, बौद्ध आणि कन्फ्युशिअनिज्म यांचा समावेश आहे. या सहा धर्मांभोवती येथील जनजीवन फिरते.हिंदूची संख्या या देशात 1.7 टक्के आहे. पण हिंदूची येथील इतिहासावर अमीट छाप असल्याने येथील संस्कृतीवरही हिंदू संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो.ऐकेकाळी इंडोनेशिया चोल वंशी राजांच्या अख्त्यारित होता. याच काळात या देशात अनेक मंदिरे तयार करण्यात आली. गणपती बाप्पाला बुद्धी, समृद्धी आणि विज्ञानाचे प्रतिक मानण्यात येते. त्यामुळेच इंडोनेशियाच्या नोटेवर बाप्पा विराजमान आहे.