
खानापूर येथील हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत शौर्य स्पोर्ट्स बेळगाव हा क्रिकेट संघ विजेता

खानापूर येथील मलप्रभा पटांगणावर प्रकाश झोतातील हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेची सर्व बक्षीसे माजी आमदार व भाजपा नेते अरविंद पाटील यांच्याकडून देण्यात आली होती या स्पर्धेमध्ये एकूण 38 संघाने भाग घेतला होता यापैकी अंतिम सामना हा शौर्य स्पोर्ट्स बेळगाव व अक्वा स्पोर्ट्स खानापूर या दोन्ही संघांमध्ये झाला असताना शौर्य स्पोर्ट्स बेळगाव हा क्रिकेट संघ या हाफ पीच क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ ठरला

या क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या संघांना बक्षीस वितरण करतेवेळी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लाप्पा मारीहाळ युवा नेते व हेबाळकर कंट्रक्शन चे किशोर हेबाळकर रामा साळुंखे संतोष चीनवाल राहुल सावंत ग्रामपंचायत सदस्य विनोद कदम स्पर्धेचे आयोजन केलेले युवा कार्यकर्ते तसेच क्रिकेट खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
