
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई सोमवार दि. 23 जानेवारी रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. खासगी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी त्यांचा हा बेळगाव दौरा आहे.
सोमवारी सकाळी 11 वाजता विशेष विमानाने बेंगळूर येथील एचएएल विमानतळावरून ते बेळगावला निघणार आहेत. दुपारी 12.15 वाजता सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. सीपीएड् मैदानावरील खासगी कार्यक्रमात ते भाग घेणार असून दुपारी 2 वाजता विशेष विमानाने ते बेंगळूरला रवाना होणार आहेत.
