
हिरेबागेवाडी येथे निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या पथकाने एका व्यक्तीकडून चौदा किलोहून अधिक वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले.एका वाहनातून हे चांदीचे दागिने महाराष्ट्रातील हुपरी येथून कर्नाटकात नेण्यात येत होते.जप्त करण्यात आलेल्या चांदीच्या दागिन्यांची किंमत 987770 रू इतकी आहे.दागिने नेत असलेल्या व्यक्तीचे नाव शशांक पाटील आहे.चांदीचे दागिने महाराष्ट्र पासिंगच्या ( एम एच 09 सी एम 5249) या वाहनातून नेण्यात येत होते. दागिन्या बाबत संबंधित व्यक्तीकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती.त्यामुळे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.या संबंधी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
