
समीतीचे उमेंदवार, नीरंजन सरदेसाई यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा.
खानापूर ; महाराष्ट्र एकीकरण समितीचे कारवार लोकसभेचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांना खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांतुंन उत्तम प्रतिसाद लाभला असून, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून संपूर्ण खानापूर तालुका त्यांनी पिंजून काढला आहे. त्यामुळे त्यांना खानापूर सह कारवार, हल्ल्याळ या मराठी भाषिक भागातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खानापूर तालुक्यात त्यांना लाभलेला प्रतिसाद पाहता, त्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे. व तसे दिसून येत आहे. तसेच निवडणुकीत ते नवखे असले तरी, त्यांचे काका दिवगंत आमदार निळकंठराव सरदेसाई, यांनी खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अथक परिश्रम घेऊन, प्रसंगी आपले सोने नाणे विकून, उभारलेला भाग्यलक्ष्मी साखर कारखाना ( लैला शुगर), तसेच आपल्या इनामी गावातील गोरगरिबांना दान केलेल्या जमिनी, व समाजासाठी केलेला त्याग फार मोठा आहे. त्यामुळे याची पुण्याई सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान होणार असून, एकंदर ते चांगलीच लढत देणार असल्याचे दिसून येत आहे.
ते उच्चशिक्षित एमबीए पदवीधारक असून, त्यांचे वकृत्व प्रभावशाली आहे. त्यांचे पिताश्री थोर विचारवंत, थोर साहित्यिक, व अभ्यासू व्यक्तिमत्व उदयसिंह सरदेसाई यांची, त्यांना देणगीच लाभली असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण तालुका पालथा घातला असून, याचा फायदा त्यांना पुढील काळात होणार असून, मोडकळीस आलेल्या समितीच्या पुनर्बांधणीसाठी, पुढील काळात निश्चितच फायदा होणार आहे.
ज्याप्रमाणे छत्रपति शिवाजी महाराजांनी आपल्या मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्याप्रमाणे निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्बांधणीसाठी करत आहेत. आपले सहकारी रमेश धबाले, रणजीत पाटील, मुकुंद पाटील, संदेश कोडचवाडकर, नागेश भोसले, बाळासाहेब शेलार, सुनील पाटील, मिलिंद देसाई तसेच अनेक युवा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने, म ए समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, आबासाहेब दळवी, मारुतीराव परमेकर, विलासराव बेळगावकर, तसेच समितीचे जेष्ठ नेतेमंडळी, यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण खानापूर तालुक्यात त्यांनी म ए समितीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे.
शनिवारी खानापूर शहरात त्यांच्या प्रचारार्थ, प्रचार यात्रा मीरवणुक काढण्यात आली. त्यानंतर मोठी सभा झाली. त्यावेळी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.
