कर्नाटक पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडून महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवासी व वाहनधारकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक राज्या च्या अतिरिक्त पोलीस महासंचालकानी येऊन महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवासी व वाहनधारकांचे पुष्प देऊन स्वागत केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कायदा व सुव्यवस्था सीमा भागात व्यवस्थित राहावी. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य राहील असे त्यांनी आश्वासन दिले.
खास करून कोल्हापूर येथून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून कर्नाटक बस व कर्नाटक शासनाच्या तसेच इतर कोणत्याही वाहनावर दगडफेक करू नये अशा सूचना त्यांनी यावेळी पुष्प देताना केले.