
खानापूर : खानापूर शहरामधील काही ध्येयवेड्या लोकांनी 50 वर्षांपूर्वी 26 जानेवारी 1973 या प्रजासत्ताक दिनादिवशी या व्यायाम शाळेची (मंदिर) स्थापना केली ही संस्था स्थापन करण्यामध्ये निवृत्त शिक्षक जेष्ठ सामाजिक नेते श्री दिलीपदादा पवार कै.श्री उदयसिंह सरदेसाई.श्री वसंत निर्मळे, गुरुजी,कै श्री बळीराम बिरजे,ऍड श्री हेमंत साळगावकर व श्री प्रकाश अंगडी यांचे मोलाचे योगदान लाभलेले आहे सतत 12 वर्ष अध्यक्षपद भूषविलेले एकमेव व्यक्ती म्हणजे श्री दिलीपदादा पवार होय.श्री दिलीपदादा पवार व ऍड हेमंत साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली व्यायाम शाळेची इमारत पूर्ण करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने श्री विजय चव्हाण श्री प्रकाश देशपांडे,कै श्री यल्लाप्पा सावंत श्री मोईद्दीन दावनगिरी,कै श्री दत्ता कुंभार, कै शरद अंगडी,श्री प्रकाश चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आज हीच संस्था जवळजवळ दिड कोटीच्या घरामध्ये आहे या व्यायाम मंदिरमध्ये व्यायाम शाळेचे अध्यक्षपद भूषविलेले कै श्री यल्लाप्पा सावंत कै श्री सिद्धोजी गावडे श्री मोइद्दीन दावनगिरी श्री दिलीप सावंत यांच्या कारकिर्दीत आजतागायत मलप्रभा श्री व खानापूर श्री या भव्य स्पर्धा भरविण्यात आलेल्या आहेत खानापूर श्री या स्पर्धेचा पहिला बहुमान कै श्री शरद अंगडी श्री सुभाष गावडे,श्री जयवंत दोरागते कै श्री सिद्धोजी गावडे श्री नितिन पाटील श्री सचिन कोडचवाडकर ( करंबल ) राहुल सावंत यांनी हा किताब पटकाविला आहे येत्या 28 रोजी जुन्या सर्व पदाधिकारी व व्यायामपटूनचा सत्कार सोहळा होणार आहे तरी सर्व व्यायामपटू व सर्व नागरीकांनी या सत्कार सोहळ्याला उपस्थित रहावे असे श्री राहुल सावंत कू.संदिप अंगडी व ऍड श्री सचिन साळगावकर यांनी कळविले आहे
