
खानापूर व्यायाम मंदिराला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून दिनांक 28 जानेवारी रोजी साजरे करण्यात आले, सकाळी सत्यनारायण महा पुजा करण्यात आली तर सायंकाळी सात वाजता संस्थापक सदस्यांचा व इतर व्यायाम पटूंचा सत्कार करण्यात आला, प्रमुख पाहुणे म्हणून मिस्टर इंडिया प्रीतम चौगुले व बेळगावचे बेस्ट पोझर राजकुमार दोर्गुडे, व पत्रकार प्रकाश देशपांडे उपस्थित होते,

यावेळी युवा व्यायाम पट्टू राहुल सावंत यांची खानापूर व्यायाम मंदिराच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येवुन शाल व श्रीफळ देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी व्यायाम मंदिराचे संस्थापक सदस्य दिलीप पवार, प्रकाश चव्हाण, एडवोकेट साळगांवकर, मोहीदींन दावणगिरी डॉ सुदर्शन सुळकर, लक्ष्मण पाटील, रवी डीलीमा, रवी गुंजीकर, वसंत देसाई, बाळू सावंत, या सर्व संस्थापक सदस्यांचा व्यायाम मंदिराच्या वतीने शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक सावंत, व प्रतीक परीट यांनी केले तर आभार कीरण पाटील व रमेश कवळेकर यांनी मानले, यावेळी व्यायाम मंदिराचे युवा व्यायाम पट्टू व नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते,
