हिंगोली – भारत जोडो यात्रेत माजी मंत्री सतेज पाटील यांच्या दहा हजारांवर समर्थकांनी भगवे फेटे बांधून सहभाग नोंदविला. नफरत छोडो , भारत जोडो अशा घोषणा देत ही मंडळी सहभागी झाली होती.
खा. राहुल गांधी साडे सहाच्या सुमारास यात्रेत सहभागी होण्यासाठी आल्यानंतर तेथे हे फेटेधारी कोल्हापूरकर स्वागतासाठी सज्ज होते. गुलाबी थंडीत बसमधून ही मंडळी भल्या पहाटेच येथे दाखल झाली होती. त्यानंतर तेथे सर्वांना फेटे बांधण्यात आले.
पुरोगामी शाहू महाराजांनी समतेचा विचार दिला. तोच विचार पुढे घेऊन राहुल गांधी यांनी ही यात्रा काढली आहे. त्यामुळे आम्ही दहा हजार कोल्हापूरकर या यात्रेत सहभागी झाल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.