
खानापूर : तालूक्यातील जांबोटी भागातील बैलूर येथील पुरातन कालापासून असलेल्या चौराशी मंदिर व पावणाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून मंदिरांकडे जाणारा रस्ता खराब झाल्यानें सदर रस्याची ताबडतोब दुरूस्ती करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी पीडब्ल्यूडी चे AEE ची ग्रामस्थांसह भेट घेऊन केली,

पुरातनकालीन चौराशी मंदिर व पावनाई मंदिर बैलूर येथे वसलेली असून दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी केला असून त्याचा उत्सव दिनांक 25 मार्च ते 28 मार्च असा सलग चार दिवस चालणार असून दिनांक 28 मार्च रोजी मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी संपूर्ण बैलूर गाव व पंचक्रोशीतून खानापूर तालुका व बेळगाव जिल्ह्यातून सुद्धा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यासाठी मंदिराकडे जाणारा रस्ता व्यवस्थित असणे जरुरी आहे सध्या रस्ता व्यवस्थित नसल्याने भाविकांची गैरसोय होऊ शकते ती होऊ नयेत म्हणून पीडब्ल्यूडी खात्याने ताबडतोब रस्ता दुरूस्ती करून देण्याची मागणी त्यांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्याकडे केली,
मागणीची दखल पीडब्ल्यूडी चे ए ई ई नी ताबडतोब घेऊन त्यांची मागणी मान्य केली असून ताबडतोब रस्ता दुरूस्ती करून देण्याची ग्वाही दिली आहे, त्यामुळे भाविकांची रस्त्या अभावी होणारी गैरसोय टळणार आहे, यावेळी बैलूर ग्रामस्थ उपस्थित होते,
