
खानापूर : असोगा तीर्थक्षेत्रातील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री रामलिंग देवस्थान विश्वस्थ समिती, असोगा( Shri Ramling Dev Trust , Asoga) यांनी कर्नाटक सरकारच्या विद्यमान धर्मदाय खात्याच्या मंत्री सौ शशिकला ज्योले व त्यांचे पती खासदार श्री अण्णासाहेब ज्योले यांची भेट घेऊन श्री. रामलिंग देवस्थानचा तीर्थक्षेत्र म्हणुन विकास करावा, तसेच कल्याण मंडप, यात्री निवास बिल्डिंग,घाटबांधकाम यासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करावा अशी विनंती केली असता मंत्री शशीकला जोल्ले यांनी लवकरच असोग्याला भेट देऊन निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी श्री रामलिंग देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत गोविंद पाटील, एडवोकेट चेतन मनेरीकर, मंदिर कमिटी सदस्य सोमाण्णा मोरे, विरेंद्र मिसाळ, संदिप पाटील, होळणकर व आदि सदस्य उपस्थित होते,
