खानापूर : यमकनमर्डी विधानसभा क्षेत्रात सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपच्या वतीने निवडणूक लढवून अगदी निसटता पराभव स्वीकारावा लागलेले भाजपा युवा नेते आणी यावेळचे इच्छुक उमेदवार मारूती अष्टगी यांनी आज खानापूर येथे माजी आमदार अरविंद पाटील यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
खानापूर येथे 15 दिवसापूर्वी माजी आमदार अरविंद पाटील यांचा वाढदिवस कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्यावेळी काही कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांना वाढदिवस कार्यक्रमाला हजर राहता आले नसल्याने त्यानी आज अरविंद पाटील यांच्या खानापूर येथील कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
यावेळी त्यांच्यासोबत इंद्रजीत पाटील, वीठ्ठल कीलर्गी, लक्ष्मण अष्टगी, संतोष चीनवाल, अवधूत बेंद्रे, रेहान सय्यद, व कार्यकर्ते उपस्थित होते,