खानापूर रूमेवाडी क्रॉस ते करंबळ कत्री च्या मध्ये जे अपघात ग्रस्त क्षेत्र आहे त्या ठिकाणी आज सकाळी रेल्वेचे सिमेंट पोल वाहतूक करणाऱ्या टिप्परने गाडीवरील ताबा सुटल्याने मोटर सायकलला धडक दिल्याने
मोटरसायकल वरील हिंडलगी बिडी तालुका खानापूर येथील प्रदीप मारुती कोलकार वय वर्षे 27 व त्याच्या पाठीमागे बसलेली त्यांच्या आत्याची मुलगी ऐश्वर्या गुरनावर मुक्काम तोलगी ता खानापूर वय वर्ष 20 जागीच ठार झाले तर फॉरेस्ट खात्यातील कर्मचारी मोटरसायकल वरून उडी मारल्याने थोडक्यात वाचले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे सदर मृतदेह शल्यचिकित्सा करण्यासाठी सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले असून
खानापूर पोलीस स्थानकाचे जयराम हमन्नावर व मंजुनाथ मुसळी यांनी पंचनामा केला असुन सदर अपघात झाला त्यावेळी मृतदेह गाडीत घालण्यास कोणीही पुढे येत नव्हते तेव्हा जनता गॅरेज चे मालक प्रसाद पाटील व अनंत चौगुले तसेच पोलीस कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर व पोलीस कर्मचारी यांनी ते मृतदेह उचलून गाडीत घातले
अपघाताचे वृत्त समजताच भाजपाचे नेते विठ्ठलराव हलगेकर यांनी सरकारी दवाखान्यात जाऊन मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सात्वन केले व त्यांना धीर दिला, सदर अपघात ग्रस्त क्षेत्रात बरेच अपघात घडलेले असून असून बरेच जण मृत्यू पावलेले आहेत परंतु सदर रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्या पलीकडे काहीही करण्यात येत नाही त्यासाठी या गंभीर गोष्टीकडे तालुक्यातील राजकारण्यांनी आपापले राजकीय मतभेद बाजूला ठेवून या अपघात ग्रस्त क्षेत्राची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घ्यावात अशी जनतेतुन मागणी होत आहे,