
बेळगाव तालूक्यातील राकसकोप गावाला लागुन असलेल्या सोनोली गावाजवळ मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा दुदैवी मृत्यू झाला आहे विघ्नेश झंगरूचे असे मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की लाकडाचा भुसा वाहतूक करणारा मालवाहू ट्रकच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक बसली आणि या अपघातात ट्रक आणि ट्रॅक्टर फुलाखाली कोसळले यावेळी ढिगार्याखाली सापडून ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला
अपघाताच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीकरीता मृतदेह बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविला
