
खानापूर : शिवजयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गायन आणि नृत्य स्पर्धेला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला स्पर्धा पहाण्यासाठी तालूक्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती, खानापूरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात आली, तीपण एका मुस्लिम मावळ्याकडून असे म्हणून नागरिक इरफान तालीकोटी ना धन्यवाद देत होते,

गायन स्पर्धेत माध्यमिक गटातून सुरेश देसाई, स्वाती किडदाळ, आणि मंदिरा यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले राज्य पातळीवरील खुल्या गायन स्पर्धेत काजल पाटील, विनायक ईदलोहंडकर, आणि झाकी यांनी अनुक्रमे पहिला दुसरा तिसरा तिसरा नंबर पटकाविला
समूह नृत्य स्पर्धा तीन गटात घेण्यात आली प्राथमिक गटातून श्री दुर्गा नृतालय, वेदांत ग्रुप, आणि सेंट जोसेफ इंग्लिश मिडीयम स्कूल, यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले,
माध्यमिक गटातून एम एस डान्स ग्रुप खानापूर, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम हायस्कूल, आणि मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले खुल्या समूह नृत्य स्पर्धेत युनायटेड क्रो व्ही बी डान्स अकॅडमी आणि कलाकृती ग्रुपने पहिले तीन क्रमांक पटकाविले तालुक्यातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना संधी मिळावीत म्हणून दरवर्षी आपण या स्पर्धेचे आयोजन करत असून प्रत्येक वर्षी यापुढेही आयोजन करत राहणार असल्याचे इरफान तालीकोटी यांनी सांगितले,
कार्यक्रमाला शंभुलिंग शिवाचार्य स्वामी सागरनाथ महाराज नेल्सन पिंटो,
एम ए इनामदार, प्रा अरविंद एल पाटील. डॉक्टर रफीक हलशीकर, आदि मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले,
