खानापूर : एम के हुबळी येथे दि 28 जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री आणी भाजपाचे राष्ट्रीय नेते अमीत शहा यांची होणारी सभा खानापूरातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावुन यशस्वी करावीत असे आवाहन भाजपाचे राज्य प्रधान कार्यदर्शी महेश तेंगीनकाई व भाजपा जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांनी केले, राजा श्री शिवछत्रपती शीव-स्मारक या ठिकाणी झालेल्या भाजपा पदाधिकारी व बुथ कमिटी अध्यक्ष व कार्यकर्ते यांच्या बैठकीत बोलताना आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालूका अध्यक्ष संजय कुबल होते,
यावेळी संजय कुबल यांचे कार्यकर्त्यांना व पदाधिकारीना उद्देशून मार्गदर्शनपर भाषण झाले, प्रथमता भाजपा युवा नेते पंडित ओगले, राजेंद्र रायका, नगरसेवक आपल्या कोडोळी व आदिनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले, यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील, भाजपाचे जेष्ठ नेते विठ्ठलराव हलगेकर, महिला राज्य कार्यकारीणी सदस्या धनश्री सरदेसाई, राज्य वननीगमचे संचालक सुरेश देसाई, बेळगाव भाजपा सेक्रेटरी महेश पाटील, संघटन मंत्री जयप्रकाश, पी एल डी बँकेचे माजी चेअरमन विजय कामत, भाजपा मुख्य कार्यदर्शी बसवराज सानीकोप, माजी जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी, ता पं माजी सदस्या वासंती बडिगेर व आदि नेते मंडळी उपस्थित होते,
यावेळी झालेल्या बैठकीत येत्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट कोणालाही मीळुदेत सर्वानी एकजुटीने आपापसातील मतभेद बाजूला ठेवून खानापूर मध्ये भाजपाचाच आमदार निवडून आणण्याचा निर्धार सर्वानी व्यक्त केला,
बैठकी नंतर राजा श्री शिवछत्रपती चौकात राज्य जनरल सेक्रेटरी महेश तेंगीनकाई, जिल्हा अध्यक्ष संजय पाटील व पदाधिकारी यांच्या हस्ते भाजपा कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या दुचाकी गाड्या वरती भाजपाचे स्टीकर लावण्यात आले,