 
 
दहावीचे वर्ष हे अत्यंत महत्त्वाचे असते दहावी उत्तीर्ण झाल्यावर आपण दिशा ठरवायचे असते म्हणून दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम निवडताना आपण सावधगिरी बाळगावयास हवी कोणी सांगतो म्हणून अभ्यासक्रम न निवडता आपण विचारपूर्वक निर्णय घ्यावा आपली आवड, आपला कल आणि त्याचबरोबर आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विषयाची निवड करावीत असे संबोधन प्राध्यापक आनंद मेणसे यांनी केले,
सहकारातून सामाजिक जबाबदारी या तत्त्वानुसार लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप सोसायटीच्या गणेशपुर शाखेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यासाठी करियर गाईडस या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रा मेणसे बोलत होते ते म्हणाले कोणताही विषय चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक असते असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकण्याचा सल्ला दिला तसेच आपल्या भाषणात त्यांनी मुलांना विविध विषयाची ओळख करून दिली
लोकमान्य सोसायटीचे बेळगाव विभागाचे रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी असिस्टंट रीजनल मॅनेजर चंद्रशेखर पाटील मराठी विद्यानिकेतनचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत समन्वयक नीला आपटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
गणेशपूर शाखेच्या शाखाधिकारी सौ सुनीता सातेरी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले त्या म्हणाल्या की आजची पिढी हुशार व शार्प आहे त्यांना मार्गदर्शनाची जोड मिळाली तर भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यास मदत होईल म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सौ सातेरी यांनी सांगितले सूत्रसंचालन भूषण वालावलकर व शाखा कर्मचारी श्रीकांत सुनगार यांनी केले,
मराठी विद्यानिकेतन शाळेत झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
 
 
 
         
                                 
                             
 
         
         
         
        