
बेळगाव – कर्नाटक राज्यातील समस्त मराठा समाजाला 3B मधून 2A आरक्षण मिळवण्यासाठी बेळगाव ग्रामीण भागात जनजागृती करण्यात आली.बेळगाव ग्रामीण मधील कंग्राळी खुर्द गावातून जनजागृतीला सुरुवात करण्यात आली. यावेळी 20 डिसेंबर ला होणाऱ्या मराठा समाजातील मेळाव्यासाठी कंग्राळी खुर्द गावचा जाहीर पाठिंबा ग्रामपंचायत सदस्य कलाप्पा पाटील यांनी व्यक्त केला.
पश्चिम बेळगाव मराठा समाजाचे नेते विनय विलास कदम, मराठा संघटनेचे नारायणराव झंगरूचे, क्षत्रिय मराठा फेडरेशन कर्नाटकचे बेळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष महेश रेडेकर,संजय पाटील, मराठा समाजाचे दिनेश पाटील, प्रवीण पाटील, मनोहर भुक्क्याळकर, अमोल जाधव, खाचू सुखये , मोनाप्पा भास्कर, बेळगाव जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष हनुमंत गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते.
