
खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी हे गाव खानापूर पासुन अवघ्या दोन की मी अंतरावर असुन खानापूर जांबोटी रस्त्यापासून अवघ्या आर्धा की मी अंतरावर असून साधारण एप्रिल मे महिन्यात लाखो रूपये खर्च करून सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले पण ठेकेदाराने सदर रस्ता व्यवस्थीत न केल्याने अवघ्या दोन महिन्यात रस्त्यावर खड्डे पडून संपूर्ण रस्ता उध्वस्त झाला,

ग्रामस्थांनी याविरोधात मोर्चा काढला तहसीलदार, आमदारांना निवेदने दिले, लोकायुक्त मध्ये सुध्दा तक्रार केली आमदारांनी याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले पण आजतागायत याबाबत काहीच हालचाल झाली नाही व कोणाही ईतर राष्ट्रीय पक्षानी सुध्दा याची साधी दखल घेतली नाही व ग्रामस्थांना सहकार्य सुध्दा केले नाही म्हणून गुरूवार दि 8 डिसेंबर रोजी रामगुरवाडी श्री राम मंदिरात पंचकमीटी व ग्रामस्थांची बैठक झाली व सदर निर्णय घेण्यात आला की कुठल्याही राजकीय पक्षाला व राजकीय नेतेमंडळींना गावात कुठलाही कार्यक्रम करण्यास, सभा घेण्यास बंदी घालण्याचे ठरविण्यात आले, तसेच खराब झालेला रस्ता जो राजकीय पक्ष नवीन रस्ता करून देईल त्याना कार्यक्रम करण्यास कींवा प्रचार सभा घेण्यासाठी परवानगी देण्याचे पंचकमीटी व ग्रामस्थांनी ठरविलें आहे,
उद्या रामगुरवाडी ग्राम पंचायत व्याप्तीत येणाऱ्या सहा गावातील महिलांसाठी आमदारांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम रामगुरवाडी गावात आयोजित केला असल्याचे समजते, पण ग्रामस्थांनी बंदी घातल्याने कार्यक्रमाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे,
