
सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे शनिवारी भीषण कार बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 100 हून अधिक लोक ठार झाले असून शेकडो जण जखमी झाले आहेत. राजधानीतील्या अत्यंत गजबजलेल्या भागात हा बॉम्बस्फोट झाला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या हल्ल्यात लहान मुले, वृद्ध आणि तरुणांनी देखील आपला जीव गमावला आहे.
