
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खानापूर सातेरी मिलन यांच्यावतीने खानापूर येथील शाहू नगर (डोंबारी समाज) वसाहतीत दीपोत्सव आणि फराळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला, प्रारंभी भारत मातेचे पूजन शाहूनगर येथील महिलांनी केल्यानंतर श्री माऊली मंदिर समोर दिवे लावण्यात आले
त्यानंतर शुभंकरोती कल्याणम आरोग्यम् धनसंपदा या मंत्राचा जप करण्यात आला यानंतर संघाचे स्वयंसेवक दीपक वाळवे यांचे बौद्धिक भाषण झाले, त्यानंतर सर्वांना फराळ देण्यात आला व त्यांच्याबरोबर सर्व स्वयंसेवकांनी फराळाचा आस्वाद घेतला

संघ स्वयंसेवकांनी केलेली ही दिवाळी कौतुकास्पद आहे अनेक लोक दिवाळी ही आपल्या घरापुरतीच मर्यादित ठेवतात परंतु जे आपले हिंदू बांधव उपेक्षित आहेत अशा वसाहतीत जाऊन दिवाळी साजरी करणे आणि त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेणे हे महत्त्वाचे आहे

यामुळे हिंदू धर्माचे बळ निश्चितच वाढले जाईल, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेळगाव जिल्हा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष बीटाप्पा नाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका प्रचारक महेश मोदगेकर, यांचे सहकार्य लाभले,
